pm kisan 2024 पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार ? पहा सविस्तर

pm kisan 2024 येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे. सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रक्कम वाढ केली जाऊ शकते. येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील १ फेब्रुवारीला मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) सुरू करण्यात आली आहे. त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६००० हजार रूपये दिले जातात. आता ही रक्कम वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. ही रक्कम २००० हजारांनी वाढवली जाऊ शकते. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या ६००० हजारांवरून ही रक्कम ८००० केली जाऊ शकते.

केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये देते. एका वर्षात या योजनेअंतर्गत सरकार ६००० रुपये शेतकऱ्यांना देते. हे हप्ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात. तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. तसेच जर सरकारकडून वाढिव रक्कमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव २००० रूपये मिळतील म्हणजेच एका वर्षाला ८००० रूपये थेट बँक खात्यात येतील. pm kisan 2024

Leave a Comment