50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार तारीख झाली फिक्स

50 हजार प्रोत्साहन अनुदान ; आपल्या कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 50 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे. परंतु अनुदान वाटप न झाल्याने शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळणार याबाबत प्रश्न पडला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2017, 2018 आणि 2019 यापैकी दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान जाहीर केले आहे.

या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो उस उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र असुन तांत्रिक अडचणीमुळे अनुदानाचे वाटप रखडले आहे.

अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने अनुदानाचे वाटप रखडले होते मात्र आता आचारसंहिता संपुनसुद्धा हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

दि. 24 जुन पासुन पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे तरी या पावसाळी अधिवेशनात या प्रोत्साहन अनुदानाबाबत काही निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे..

Leave a Comment