या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची १३८ कोटी रुपये नुकसान भरपाई

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची १३८ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार असून त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी प्रजन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला फटका बासला होता यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना १३८ कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे.

हि रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्गही करण्यात आली आहे गेल्या चार वर्षातील हि सर्वाधिक नुकसान भरपाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध संकटांना सामोरे जावे लागते त्यासाठी पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदि कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकासाठी देण्यात येते.

यापूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागते तर राज्य आणि केद्र शासन बाकीचा भार उचलत आहे.

चार वर्षातील सर्वाधिक नुकसान भरपाई

जिल्ह्यात मागील काही वर्षापासून पिक विमा योजना राबविण्यात येत आहे यामध्ये २०२३ मधील खरीप हंगामातील पिकाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम सर्वाधिक आहे.

सन २०२०-२१ या वर्षात 1 हजार २ शेतकऱ्यांना ३३ लाख रुपये मिळाले २०२१-२२ या वर्षात 1 हजार ७७७ शेतकऱ्यांना 1 कोटी चार लाख रुपये मिळाले होते.

सन २०२२-२३ या वर्षात २ हजार २३३ शेतकऱ्यांना दोन कोटी २४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. २०२३ च्या खरीप हंगामातील तीन लाख 77 हजार शेतकरी विमाधारक होते त्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना १३८ कोटी रुपये मिळणार आहे.

Leave a Comment