माझी लाडकी बहिण योजना नारी शक्ती दूत मोबाईल ॲप वरून करा ऑनलाईन अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेसाठी अर्ज आता नारी शक्ती दूत मोबाईल ॲप वरून करता येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक केला आहे त्यासाठी तुम्हला आता तुमच्या मोबाईल मध्ये नारी शक्ती मोबाईल ॲप डाउनलोड करून अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज केल्यामुळे मध्यस्थीना देण्यात येणार तुमचा पैसा वाचणार आहे. आणि तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.

ज्या ऑनलाईन अर्ज भारता येत नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून गावागावात शिबीर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही गोंदळ, गडबड करू नये.

प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हे देखील वाचा ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु ladki bahin yojana

ऑनलाईन अर्जासंदर्भात माहिती

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये नारी शक्ती दूत हे मोबाईल एप्लिकेशन डाउनलोड करा. ॲपडाउनलोड केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून रजिष्टर करा.

पुढे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करा असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.

सर्व माहिती भरून झाल्यानतर आता तुम्हाला तुमच्या काही व्यक्तिगत कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावी लागेल. कागदपत्रे कोणते लागेल त्या संदर्भात माहिती खाली दिली आहे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करून द्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment