एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार ११३ कोटी, याच शेतकऱ्यांना लाभ

एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११३ कोटी रुपयाचा पिक विमा जमा करण्यात आला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पिक क्षेत्रासाठी पिक विमा भरला असून त्यापैकी एक लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयाचा पिक विमा निधी जमा झाला आहे.

विमा कंपनीने बाजरी, मक्का, सोयाबीन पिकासाठी हि रक्कम मिळाली आहे.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुशंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत पिक विमा कंपनीला आदेश दिला होता.

त्या दृष्टीने जिल्हाधिकार्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरवठा देखील केला. ओरीएटल विमा कंपनीकडून मक्का, सोयाबीन, बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment