२० कोटीची मदत खात्यावर जमा या जिल्ह्यांना पाठवले पैसे पहा यादी

शेतकऱ्यांना २० कोटीची मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पण या ठिकाणी जाऊन घेऊया.

राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस गारपीठ झाल्याने पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अजून देखील आर्थिक मदत मिळालेली नव्हती.

अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आता १९ कोटी ८२ लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे.

अतिवृष्टी व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ज्याला इनपुट सबसिडी असे देखील म्हटले जाते.

तर या   इनपुट सबसिडी स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते हे आपणाला माहित असेलच.

२० कोटीची मदत खात्यावर जमा होण्यास सुरुवात

अवकाळी पाऊस आणि गारपिठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १९ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

यामुळे आपल्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली का याची उत्सुकता आता सर्व शेतकऱ्यांना लागली आहे.

सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले रब्बी, खरीप या हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिठीने हिरावून घेतला आहे शासनाकडूनही तातडीने मदत मिळत नसल्याने शेतकरी हलादिल झाला आहे.

एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यातील २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक बागायती पिकाचे नुकसान झाले आहे.

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० कोटी ५२ लाख १२ हजार ३९५ रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.

कोणत्या तालुक्यात किती रक्कम झाली जमा ( रक्कम लाखात )

नांदेड७६.०१
अर्धापूर५६.४०
कंधार११.६९
लोहा२५.३७
मुदखेड१०३१
देगलूर७.६९
मुखेड४९.१५
हदगाव१८.०७
हिमायतनगर५९.५२
किनवट६०८.७४

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा शासनाने केली असून नुकसानीचे पंचमाने करून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी केली होती.

हा निधी आता जिल्ह्याला प्राप्त झाला असून त्यापैकी १९ कोटी ८३ लाख ६६ हजार ३९४ रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment