एका रुपयात पीकविमा भरण्यासाठी १५ जुलै पर्यंत मुदत असा करा ऑनलाईन अर्ज

शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा भरण्यासाठी १५ जुलै पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे यासाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल याची माहिती जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत एका रुपयात पिक विम्याचे संरक्षण करून घेता येणार असून पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान शासनाने केले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गत शेतकऱ्यांना एका रुपयात पिक विमा हप्ता भरून सहभाग घेण्याचा निर्णय शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे.

योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ४३९ खरीप हंगामात २०२३ मध्ये सहभाग नोंदविला होता. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यसाठी हि योजना राबवली जाते.

या योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल https://www.pmfby.gov.in/ सुरु करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून आपल्या पिकाचे संरक्षण करून घ्यावा.

पिक विमा अर्ज करण्यासाठी १५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घ्यावा.

शेतकऱ्यांनी विमा काढताना हि घ्यावी काळजी

अर्ज करण्यसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पिक विम्यातील अर्ज हा आधार कार्डवरील नावाप्रमाणेच असावा

पिक विम्यातील नुकसान भरपाई हि केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार सलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते यासाठी आपले बँक खाते आधार सलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे.

आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखेच असावे लागते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment