पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त २५ टक्के अग्रिम रक्कम

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या तालुक्याला बसल्या. तालुक्यातील ५ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरला होता, विमा भरलेल्या शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के अग्रिम रक्कम देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

उर्वरित २५ टक्के अग्रिम रक्कम देण्यासाठी विमा कंपनीने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांतून कंपनीच्या कारभाराबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गतवर्षीच्या खरीप हंगामात आठ मंडलमधील ५२ हजार शेतकऱ्यांनी ६८ हजार हेक्टरवर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीने सुरुवातीला फक्त दोन महसूल मंडलला अग्रीम देण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

तर आ. समाधान अवताडे यांनी जिल्हा नियोजन मंडळच्या बैठकीमध्ये सर्वच मंडलचा समावेश करावा अशी मागणी केल्यानंतर आंधळगाव, हुलजंती, मारापूर, मंगळवेढा, पाटखळ मंडलमधील शेतकऱ्यांना बाजरी, मका पिकाला अग्रीम देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये मरवडे, भोसे बोराळे मंडल वगळण्यात आले आहे.

पाच मंडलात २५ टक्के अग्रीम विमा दिला होता मात्र उर्वरित ७५ टक्के रक्कम विमा कंपनीने दिलेच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपनीने फक्त २५ टक्के रक्कम देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करताना तुर पिकदेखील अग्रीममधून वगळण्यात आले.

चुकीचे निकष लाऊन शेतकऱ्याला विमा

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असताना इतर मंडळामध्ये दुष्काळाने पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार ७२ तासाच्या आत केली पंरतु या ताक्रीरीची पिक विमा कंपनीने शहानिशा न करता थेट निकाल काढत भरपाई पासून वंचित ठेवल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे.

चुकीचे निकष लाऊन शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे

Leave a Comment