नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांना का नाही मिळाले? पहा सविस्तर माहिती

नुकसान भरपाई अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना कशामुळे मिळाले नाही अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागले त्या त्यासंदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात केवायसी अभावी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळू शकले नसल्याचे दृश्य आहे केवायसी अभावीची प्रक्रिया पूर्ण करा व अनुदानाचा लाभ घ्या. असे आव्हान प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपोटी प्राप्त झालेली २९९ कोटी नुकसान भरपाई केवायसी अभावी शेतकऱ्यांना मिळू शकली नाही

सुमारे २४ हजार शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासन हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना देऊ शकत नाही.

केवायसीची प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण करावी असे आव्हान जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हंटले आहे. ई केवायसी न केल्याने लाभाची रक्कम किंवा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीये.

या कामासाठी संबंधित तालुका कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपले सेवा केंद्रावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही २०२२ मध्ये काही भागात अतिवृष्टी किंवा कमी पाऊस झाला होता त्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या भागामध्ये देखील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना ई केवायसी अभावी नुकसान भरपाई मिळू शकली नाही.

मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२ मध्ये मोठी हानी झाली २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना याच फटका बसला होता त्यात चाळीसगाव, मुक्ताईनगर व पारोळा तालुक्यात अधिक हानी झाली.

या हानी संबंधित प्रशासने पंचनामे केले व भरपाईसाठी अहवाल पाठविला होता यासंबधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शासनाने दिली परंतु ती ई केवायसी अभावी पडून आहे.

Leave a Comment