तालुकानिहाय पीकविमा रक्कम जाहीर, पहा कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळणार

तालुकानिहाय पीकविमा रक्कम जाहीर करण्यात आली असून कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

प्रधानमंत्री पिक  विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ताकुल्यातील महत्वाच्या विविध पिकासाठीचे  विमा कवच आणि आणि विमा हप्ता कृषी विभागाने जाहीर केला आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात विमा काढता येणार आहे. यामध्ये सर्वाधिक विमा कवच भाताला प्रती हेक्टर ५१ हजार ७६० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

त्याखालोखाल सोयाबीनला प्रती हेक्टर ३९ हजार निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शासनाने सुरु असलेल्या खरीप हंगामात केवळ एका रुपया भरून पिक्विम्याचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्यात मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलै पर्यंत नोंदणी करून योजनेत सहभाग घ्यावा.

योजनेचे प्रमुख वैशिष्टे

हि योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टी शेती कारणाने शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे.

या योजनेंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. पीकविमा रक्कम जाहीर

ई पिक पाहणी आवश्यक

ई पाहणीअंतर्गत पिकांची नोदणी करण्यात यावी  विमा योजनेत  विमा घेतलेले पिक व ई पिकपाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावती मुद्दा उद्भवल्यास ई पिक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिक अंतिम गृहीत धरण्यात येईल

Leave a Comment