पिक विमा योजना फक्त एका रुपयात भरा पिक विमा अर्ज करणे सुरु

पिक विमा योजना अर्ज करणे सुरु शेतकरी बांधवांसाठी पिक विमा भरणे हे अतिशय आवश्यक असते पिक विमा प्रत्येक वर्षी शेतकरी बांधवांना भरावा लागतो

जर एखादे वर्ष ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ असलं तर शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिशय जास्त नुकसान या ठिकाणी होत असते यासाठी पीक विमा काढणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

ज्यांच्याकडे सीएससी सेंटर आहे त्यांच्याकडून शेतकरी बांधव फक्त एका रूपात पिक विमा भरून घेऊ शकता हा पिक विमा एका रूपात कसा भरून घ्यायचा यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुमच्याकडे सीएससी आयडी असेल तर तुम्ही काही मिनिटांमध्येच हा पिक विमा तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता ही ऑनलाइन पद्धत कशी आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

पिक विमा योजना 2024 अशा पद्धतीने भरा ऑनलाइन

ऑनलाइन पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला या PMFBY अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागणार आहे.

जसे की तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर जाण त्यानंतर तुम्हाला वरील तीन रेषांवर टच करून त्या ठिकाणी सीएससी हा पर्याय निवडायचा आहे यानंतर सीएससी लॉगिन या पर्यावरणातील टच करायचे आहे.

आता या ठिकाणी तुम्हाला तुमची राज्य निवडायचे आहे राजी निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2024 च्या ही पीक विम्याचे स्कीम असेल त्या दाखवण्यात येईल.

आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ॲप्लीकेशन वर टच करायचे आहे आणि पहिल्याच पर्याय आहे एप्लीकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन झालेला असेल या फॉर्ममध्ये तुम्हाला शेतकऱ्याची जी काही माहिती आहे ती योग्यरीत्या परिपूर्णपणे टाकायची आहे.

या फॉर्ममध्ये काही स्टेप्स आहे पहिली स्टेप कंप्लिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या स्टेप मध्ये सुद्धा काही माहिती भरावी लागणार आहे.

शेतकरी पासबुक वर स्पेलिंग जसे नाव आहे तसे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे यानंतर आधार कार्ड जसे स्पेलिंग सह नाव आहे तसे नाव या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या चौकटीमध्ये टाकायचे आहे, त्यानंतर आता या ठिकाणी तिसऱ्या चौकटीमध्ये तुम्हाला तुमचा आदर क्रमांक टाकून वेरिफाय करून घ्यायचे आहे.

वरील संपूर्ण माहिती योग्य भरून वेरिफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली काही लाभार्थ्याची वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारल्या जाणार आहे अगदी योग्य रीत्या त्याच पद्धतीने माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे जर माहिती भरताना काही चुकले तर तुमचा हा पिक विमा चा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही माहिती अतिशय योग्य रित्या आणि काळजीपूर्वक या ठिकाणी भरायची आहे.

आता या ठिकाणी तुम्हाला स्टेप 3 मध्ये क्रॉप डिटेल्स भरायची आहे.

यामध्ये तुम्हाला राज्य जिल्हा आणि तालुका हे माहिती भरायची आहे.

याखाली ग्रामपंचायत व गावाची माहिती टाकायची आहे.

जर तुम्ही दोन पीक एकत्र किंवा दोन पेक्षा जास्त लावले असेल तर या ठिकाणी तुम्हाला मिक्स क्रॉपिंग या पर्यायावर ती टिक करायचे आहे आणि कोणते पिकं मिक्स करून लावलेले आहेत ते पीक या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे.

ज्या दिवशी तुम्ही ही पेरणी केलेली आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला या ठिकाणी या पुढील बॉक्समध्ये टाकायचे आहे.

ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरा खाते क्रमांक टाका सर्वे क्रमांक टाका आणि यानंतर सबमिट या बटनावरती टच करा.

या ठिकाणी तुम्ही पिके सुद्धा ऍड करू शकता तुम्हाला जे पीक ॲड करायचा आहे ते पीक तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता कसे ॲड करायचे  अधिक माहिती बघण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ सुद्धा बघू शकता.

आवश्यक कागदपत्रे

ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे.

या ठिकाणी तुम्हाला पासबुक चे फोटो किंवा पीडीएफ फाईल तयार करावी लागणार आहे

सातबारा आणि आठ अ.

पिक पेरा/स्वघोषणापत्र.

जर तुम्ही केलेली जमीन भाडे तत्त्वावरती असेल किंवा भांडी करायला वरती असेल तर या ठिकाणी तुम्हाला tenant certificate अपलोड करण्याची गरज आहे.

ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक preview च बटन दिसेल यावर टच करून तुम्ही माहिती कशा पद्धतीने भरली आहे ती माहिती या ठिकाणी बघू शकता.

संपूर्ण माहिती बघून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या पर्यायावरती टच करायचे आहे आता जसे तुम्ही हे सबमिट कराल तसे ज्या शेतकऱ्याचा विमा आपण भरलेला आहे त्या शेतकऱ्याला मेसेज पाठवण्यात येईल.

या मेसेज मध्ये शेतकऱ्यांना पॉलिसी आयडी व इतर काही डिटेल्स पाठवण्यात येईल ही माहिती शेतकऱ्यांना जपून ठेवायची आहे.

यानंतर आता पेमेंट करायचे आहे पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या बटणावर टच करा.

जितके पीक तुम्ही ऍड केलेले आहे तितके पेमेंट तुम्हाला करावे लागणार आहे जसे की तुम्ही जर दोन पीक ऍड केले असेल तर तुम्हाला दोन रुपये या ठिकाणी पेमेंट द्यावी लागणार आहे.

जशी तुम्ही या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल कराल त्यानंतर तुम्ही भरलेल्या पीक विम्याची सुद्धा काढू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी एका रुपयाचा तुमचा पीक विमा सी एस सी आयडी माध्यमातून भरू शकतात.

Leave a Comment