पीएम किसान सन्मान निधीचे २ हजार रुपये तुम्हाला मिळणार का ? असे करा ऑनलाईन चेक

पीएम किसान सन्मान निधी सतरावा हफ्ता दिनांक 18 जून 2024 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे व हा आता तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकता pm kisan online status check.

या ठिकाणी आपण बघणार आहोत की पीएम किसान निधीची ऑनलाईन स्टेटस कशा पद्धतीने मोबाईलवर चेक करायचे.

काही दिवसांपूर्वी पीएम किसान निधी 17 वा हफ्ता कधी मिळणार याची तारीख फिक्स केलेली आहे ही तारीख 18 जून 2024 आहे यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयापर्यंत लाभ मिळतो.

या लाभासाठी तुम्ही पात्र आहे की नाही हे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता. ही पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही हे जाणून घेऊ शकता.

अशा पद्धतीने बघा पीएम किसान स्टेटस

जर तुम्हाला बघायचे असेल की तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहे किंवा नाही तर यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये जावे लागेल.

आता तुम्हाला या ठिकाणी PFMS हे सर्च करायचे आहे आणि पहिल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरील कोपऱ्यात दिलेल्या तीन आडव्या रेषा दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला तुमच्यासमोर बरेचसे पर्याय दिसेल त्यापैकी पर्याय क्रमांक पाच म्हणजेच डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायची आहे.

पुढील पेजवर तुम्हाला कॅटेगिरी निवडायची आहे म्हणजेच कोणत्या योजनेचे स्टेटस तुम्हाला चेक करायचे आहे ती योजना या ठिकाणी निवडायची आहे. या पर्यायामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

डीबीटी स्टेटस मध्ये पेमेंट या पर्यायाला निवडा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या एप्लीकेशन आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खालील चौकटीमध्ये कॅपच्या भरायचा आहे.

ही संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली दोन बटन्स दिसेल त्यापैकी सर्च या बटणावर टच करा.

बटनावरती टच केल्यानंतर आता तुमच्या संपूर्ण माहिती आलेली आहे जसे की हा कितवा हफ्ता मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहे, फंड स्टेटस ही बाब खूप महत्त्वाची आहे जर या ठिकाणी अप्रुड बाय एजन्सी दाखवत असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा हस्ता मिळणार आहे.

अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी दोन हजार रुपये मिळणार की नाही हे ऑनलाईन पद्धतीने अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता.

Leave a Comment