नव्या २२४ महसुल मंडळात दुष्काळ जाहीर यादीत नाव पहा drought news

drought news दुष्काळी परिस्थितीचा लाभ मिळावा, या साठी शासनाने दुष्काळसदृश जाहीर केलेल्या महसूल मंडलांच्या व्यतिरिक्त त्यात विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या मंडलांतही दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे. १९ जिल्ह्यांतील २२४ मंडलांचा यात समावेश आहे. या आधीप्रमाणेच नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडलांत सर्व सवलती तातडीने लागू केल्या आहेत.

कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती असलेल्या ४० तालुक्यांत सुरवातीच्या काळात शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली. त्यानंतर पुन्हा टंचाई असलेल्या व ज्या महसुली मंडलांत जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मलिमिटरपेक्षा कमी झाले आहे

अशा १०२१ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. तेथे सवलती लागू केल्या. या १०२१ मंडलांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडले स्थापन करण्यात आली आणि त्या मंडलांत अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, drought news

अशी नवीन महसूल मंडले देखील दुष्काळसदृश मंडले म्हणून जाहीर करावीत, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १९ जिल्ह्यांतील २२४ नवीन मंडले दुष्काळ सदृश घोषित केली आहेत. नव्याने जाहीर दुष्काळसदृश मंडलांत  नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ३४, त्या पाठोपाठ धुळ्यातील २३, जळगावातील २४ मडंलांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मंडळाची यादी पहा

 • पुणे ः १४
 • सातारा ः १२
 • सांगली ः २
 •  सोलापूर ः १०
 • कोल्हापूर ः ५
 •  धुळे ः २३
 • जळगाव ः २४
 • नाशिक ः १३
 •  नगर ः ३४
 • छत्रपती संभाजीनगर ः १६
 • जालना ः ३
 • परभणी ः १३
 • हिंगोली ः ७
 • नांदेड ः ५
 •  लातूर ः ६
 • बीड ः १९
 • धाराशिव ः १०
 • नागपूर ः ५
 • वर्धा ः ३

Leave a Comment