दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी अनुदान जमा होणार

शासनाने गाय दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रती लिटर अनुदान जाहीर केल्यानंतर आता दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी अनुदान जमा केले जाणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शासनाने जाहीर केलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रती लिटर अनुदान योजनेंतर्गत खाजगी व सहकारी दुध संघाकडील नोंदणी केलेल्या १७ हजार ९६९ शेतकऱ्यांना 3 कोटी १४ लाख ६४ हजार अनुदान मंजूर झाले होते.

त्यापैकी 1 जून अखेर १६ हजर २७३ गाय दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी ८३ लाख रुपये ७८ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.

१० जानेवारी ते १० फेब्रुवारी या एका महिन्यासाठी अनुदान योजना होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे या योजनेस १० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

दीड हजार शेतकऱ्यांना मिळणार २८ लाख रुपये

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे तसेच अनुदान प्रदानाची हि प्रक्रिया सुरु असून जूनअखेरपर्यंत जिल्ह्यातील एक हजार ६९६ शेतकऱ्यांना २७ लाख ८५ हजार ३२५ रुपये वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

योजनेच्या जाचक अटीचा शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यात दिवसाला जवळपास ४ लाख लिटर गायीच्या दुधाचे संकलन होते अनुदानासाठी सरकारने अनेक जाचक अटी लावल्या होत्या

पशुधनाचे आधार कार्ड शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे, शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे तसेच दुधाळ जनावरांची नोंदणी आयएनपीएचच्या पोर्टलवर करणे, शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याची नोंदणी आयएनपीएचच्यापोर्टलवर करणे यासह इतर जाचक अटी सरकारने यात लादल्या होत्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment