दुष्काळ अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा

दुष्काळ अनुदान; राज्यात अपुऱ्या पावसामुळे २०२३ मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३५०० रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या दुष्काळी अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार याची संपूर्ण माहिती पाहूया…

राज्यातील १५ जिल्ह्यांतील एकूण ४० तालुक्यांचा दुष्काळात समावेश करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरायत (कोरडवाहु) ई पिक पाहणी केली आहे, त्यांना १३५०० रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे. तसेच या दुष्काळी अनुदानासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, या अनुदानाचे वितरण सुरू करण्याचे हालचाली सुरू झालेल्या आहेत.

शासनाच्या शासन निर्णयानुसार (GR) आर्थिक वर्षातून एकदा निविष्ठा अनुदान वितरित केले जाते. जुलै 2023 मध्ये, काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे आणि नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना सामिल करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही अतिवृष्टी किंवा गारपिटीच्या नुकसान भरपाईच्या अंतर्गत समाविष्ट असाल, तर तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तरीही तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही.

दुष्काळ अनुदानास पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित महसूल मंडळाच्या तलाठ्याकडून उपलब्ध होणार आहे. तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असल्यास, तुमच्या तालुक्याशी संपर्क साधा आणि eKYC पूर्ण नसेल तर ते पूर्ण करा. दुष्काळ अनुदानाची रक्कम तुमच्या आधार लिंक बॅक खात्यात DBT द्वारे जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा…

Leave a Comment