अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी मिळणार मंडळानुसार यादी पहा

नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी निधी मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

सिल्लोड तालुक्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी ३७ कोटी ४७ लाख ३४ हजार ४०० रुपयाची मदत प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

२६ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते कापूस, तूर तसेच इतर शेतीमाल शेतकऱ्यांच्या हाती येत असतानाच निसर्गाच्या आकृपेने पिके हातातून गेली होती.

प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसार तालुक्यातील १३१ गावातील २७ हजार ५५४ हेक्टर वरील क्षेत्र अवकाळीच्या विळख्यात सापडल्याचा अहवाल दिला होता.

यामुळे ६८ हजार ९०१ खातेदार शेतकऱ्यांना अवकाळीच्या फाटक्यामध्ये झालेल्या नुकसानीची अनुदान रक्कम मिळाली आहे

यासाठी ३७ कोटी ४७ लाख ३४ हजार ४०० रुपयाची मदत लवकरच तालुका प्रशासन वाटप करणार आहे.

मंडळानिहाय यादी पहा

मंडळएकूण बाधित क्षेत्रखातेदार संख्यामिळणारी रक्कम
बोरगाव बाजार४ हजार ५६२9 हजार ३८६ कोटी २० लाख ४४ हजर ८३२ रुपये
अमठाना४ हजार ३१२८ हजार ९८५ कोटी ८६ लाख 55 हजार १६८ रुपये
निल्लोड४ हजार ६८५१० हजार ५७४६ कोटी ३७ लाख १७ हजार ७६८ रुपये
गोळेगाव बुदुक3 हजार २८५७ हजार ९९९४ कोटी ४६ लाख ८३ हजार ४८० रुपये
भराडी1 हजार ९९६४ हजार ७२९२ कोटी ७१ लाख ४६ हजार ९६० रुपये
अजिंठा3 हजार ६४१७ हजार ४०६४ कोटी ९५ लाख १८ हजार ५५२ रुपये
अंभाई२ हजार ७६१७ हजार ८५५3 कोटी ७६ लाख ६० हजार १६८ रुपये
सिल्लोड२ हजार ३०२५ हजार ९०६3 कोटी १३ लाख ७ हजार ४७२ रुपये

Leave a Comment