13 जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा यादी :  हे शेतकरी पिक विमा साठी पात्र Pik Vima Yadi

Pik Vima Yadi नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीप पिक विमा 2023 चा उर्वरित पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

 क्लेम केलेल्या परंतु अद्याप देखील पिक विम्याची रक्कम न मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपन्यांकडून पिक विम्याचे हस्तांतरण सुरू करण्यात आला आहे.

 यापूर्वी मिळालेल्या 25 टक्के पिक विमा वितिरिक्त उर्वरित पिक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे.

क्लेम केलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा न झालेल्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना कापूस पिकाचे पीक विम्याच्या रकमे जमा होण्यास सुरू करण्यात आलेले आहे.

 तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस मका या पिकांच्या क्लेम केलेल्या रकमांचे समायोजन करून पिक विमा देण्याचे सुरू करण्यात आलेले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित अग्रीम पीक विमा वितरिक्त समायोजित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरू करण्यात आलेले आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकाचा पिक विमा जमा होत आहे.

बीड सोलापूर या जिल्ह्यातील पिक विमा जमा होणे अद्याप देखील बाकी आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. Pik Vima Yadi

Leave a Comment