Pikvima and nuksaan bharpaai पिकविमा आणि नुकसान भरपाई या बॅंकेत जाणार

Pikvima and nuksaan bharpaai सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिकविमा तसेच नुकसान भरपाई तसेच थकित असलेल्या अनुदानाचे वितरण सुरू आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार यापुढे पिकविमा, नुकसान भरपाई, पिएम किसान योजनेचे हप्ते तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते इतर शासनाचे अनुदान आधार लिंक बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे माहीत नसते, आपल्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे कसे पहावे याबाबत संपूर्ण माहिती पाहुया.. (aadhaar link bank account)

पिकविमा भरताना तुम्ही जो खाते क्रमांक दिला तो खाते क्रमांक आधारशी लिंक नसेल तर त्या खात्यात पिकविमा जमा होणार नाही. शासनाकडून हे पैसे DBT च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहेत त्यामुळे आपल्या आधारशी लिंक असलेल्या बॅंक खात्यात पिकविमा नुकसान भरपाई पिएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले का चेक करा. आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा. (Aadhaar link bank account)

आपल्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे पाहण्यासाzठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागले. https://myaadhaar.uidai.gov.in/ त्यानंतर login या पर्यायावर क्लिक करा. नंतर आधार क्रमांक टाटा send otp वर क्लिक करा व otp टाकून लाॅंगिन करा. नंतर bank seeding status या पर्यायावर क्लिक करा. नंतर आपल्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे हे दिसेल.

येथे ज्या बॅंकेचे नाव दिसेल त्या बॅंकेत तुमचा पिकविमा, नुकसान भरपाई, पिएम किसान योजनेचे हप्ते तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते तसेच शासकीय इतर अनुदान जमा होते. अशाच शेतीविषयक नवनवीन माहिती साठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. आणि इतर शेतकऱ्यांना हि माहिती नक्की शेअर करा… Pikvima and nuksaan bharpaai

Leave a Comment