Pik vima update Maharashtra – या जिल्ह्यातील फक्त 37 हजार शेतकऱ्यांना खरीप पिकविमा मिळणार.

Pik vima update Maharashtra राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत होते, प्रहार संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे या कामाला वेग आला आहे, या जिल्ह्यातील 37,902 शेतकरी नैसर्गिक आपत्तीचे दावे म्हणून. 10.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या आधी किमान 2 लाख शेतकरी पीकविमा मिळवण्यासाठी अपेक्षित होते, मात्र महसूल मंडळात जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत अधिसूचना जारी केल्या होत्या. असं असतांना सुद्धा अधिक प्रमाणात शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते.

Pik vima update Maharashtra तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधिंनी वेळोवेळी आंदोलने केली जात होती, परंतु प्रहार संघटनेने पिकविमा वाटपकरण्यासाठी 20/मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन, पिकविमा कंपनीला नोटीस दिली गेली, या संदर्भात विमा कंपनीने 37,902 शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे दावे म्हणून, 10,75 कोटी रुपये मंजूर केले.

अशी माहिती प्रहार संघटनेला देत (NCIP) पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विलंब होत असल्याचे सांगिल.

या पोर्टलच्या समस्याचे निराकारण झाल्यानंतर पेमेंट प्रक्रिया सुरु केली जाईल, या प्रक्रियेला किमान 8/10 दिवस लागू शकतात. पीकविमा कंपनीने 20/जून/2024 पर्यंत CCE दावे वितरण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment