सोयाबीन व तुरीच्या दारात मोठी वाढ पहा आजचे भाव soyabin and tur

soyabin and tur आठवड्याचा शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी उदगीरच्या बाजारात शेतमालाचे भाव वाढल्याचे दिसून आले त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

यामध्ये तूर एक हजार, हरभरा ६०० रुपये तर सोयाबीनच्या दारात 200 क्विंटलने वाढ झाली तुरीचा हंगाम संपत असल्याने व मागणी वाढल्याने तुरीच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.

मागील १५ दिवसात हरभरा दरामध्ये कमालीची घसरण दिसून आली होती. बाहेर देशातून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटण्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत हरभर्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे व्यापारी म्हणत आहे.

चांगल्या प्रतीच्या हरभर्याचा दर ५ हजार ६०० रुपयापर्यंत तर सोयाबीनचे दर मागील तीन महिन्यापासून ४ हजार ४०० ते ४५० च्या आसपास स्थिरावले आहे. soyabin and tur

तुरीला १० हजार ७०० प्रतीक्विंटल भाव मिळत होता परंतु या आठवड्यात बाजारातील सर्वच शेतमालाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

या वर्षी रब्बी व खरीप हंगामातील सर्वच शेतमालाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती कमी प्रमाणत आले आहे.

उत्पादन कमी झाले असल्याने दरवाढीची अशा होती परंतु बाजारात मात्र सर्वच शेतमालाचे दर घसरत चालले होते.

हंगामध्ये सुरुवातील ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या सोयाबीनचा दर ४ हजार ४०० पर्यंत खाली आला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री करण्याच्या एवजी घरीच ठेवला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment