पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार pikvima news

pikvima news राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील पीकविमा रक्कम जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी पण जाणून घेणार आहोत.

प्रतीक्षेत असलेल्या खरीप हंगाम २०२३ च्या पीकविम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिल पासून वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीने दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच या पिकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रक्कमेचा लाभ होणार आहे. pikvima news

त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या ७२ तासात तक्रारी न केल्यास ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे पीकविमा कंपनीने वगळली आहे.

ऑफलाईन शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकविम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मी महिन्याच्या अखेरेस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्याला शंभर राक्के पीकविमा रक्कम मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.

परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या २२ हजार ५२४ शेतकऱ्यांचाच यात समावेश आहे त्यानंतर पीकविमा कंपनीने एकाच गटातील दोन दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामुहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे.

Leave a Comment