पावणेदोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड यादीत नाव पहा nuksan bharpai

nuksan bharpai पावणेदोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

अकोला जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाने ३३२ कोटी ९६ लाखांची आर्थिक मदतही मंजूर केली आहे. यासाठी नुकसानग्रस्त २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांपैकी १ लाख ८० हजार १७१ शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात झाल्या आहेत. जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत.

जिल्हयात नोव्हेंबरअखेर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने १ हजार ७५२ गावांतील २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांचे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवरील कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, आंबा, मोसंबी, पेरू, संत्रा आदी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानाचे कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केले. त्यानुसार नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले. ३१ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने ३३३ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे nuksan bharpai

दरम्यान जिरायती शेतीसाठी या आधी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत मिळत होती त्याऐवजी आता १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी आता ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याद्या अपलोड झालेल्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

अपलोड झालेल्या याद्या

  • तालुका अपलोड शेतकरी संख्या
  • मूर्तीजापूर ३५४५९
  • तेल्हारा १६५३१
  • अकोट ४३८३२
  • अकोला ८५६९
  • बार्शीटाकळी ४१२१५
  • बाळापूर १०९८६
  • पातूर २३५७९
  • एकूण १ लाख ८० हजार १७१

Leave a Comment