या ४० तालुक्यात दुष्काळासाठी 2443 कोटी अनुदान पहा लाभार्थी यादी Dushkal Anudan Yadi

Dushkal Anudan Yadi राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 40 तालुक्यांमधील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आता सरसकट मदत जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. यासाठी गावनिहाय याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र जमा करायचे आहेत

शेतकरी मित्रांनो राज्यात 2023 मध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले संपूर्ण राज्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीच्या 50 ते 55 टक्क्यांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले होते आणि परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र आपण पाहिले.

शेतकऱ्यांच्या या संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना 2443 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यासाठी सुरुवातीला असणारी 02 हेक्टर पर्यंतची मर्यादा देखील राज्य सरकारने 03 हेक्टर पर्यंत वाढवली आहे.

यामध्ये पिकानुसार शेतकऱ्यांना सरसकट रक्कम दिली जाणार असून याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. तालुक्यांची यादी व त्याचप्रमाणे गावनिहाय पात्रता यादी देखील शेतकऱ्यांना खाली पाहता येणार आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होणार आहे. Dushkal Anudan Yadi

सदरील रक्कम ही डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याने पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे अनिवार्य असणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पात्रता यादी तपासायची आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आवश्यक सर्व कागदपत्र जमा करायची आहेत.

यादीत आपले नाव पहा

Leave a Comment