जमीन मोजणीसाठी घरातूनच करा ऑनलाईन अर्ज असा करा अर्ज Land Survey Application

Land Survey Application जमीन मोजणीसाठी आता घरातूनच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे काय कागदपत्रे लागणार आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

भूअभिलेख विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणीची प्रक्रिया सुरु होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे.

टप्प्याटप्याने राज्यातील सर्व जिल्ह्यात ई मोजणी २.० या नवीन संगणक प्रणालीला सुरुवात होणार आहे अर्जदारांना मोजणी प्रकरणात मोजणी अर्ज दाखल करणे, फी भरणे, संभाव्य तारीख घेणे, अर्जाची स्थती, अर्ज निकाली लागेपर्यंत अर्जदारास भूअभिलेख कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

भूअभिलेख विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे सद्यस्थितीला तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रायोगिक तत्वावर हि प्रक्रिया राबविली जात आहे.

दोन ते तीन महिन्यानंतर सर्व सामन्यासाठी हि प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. Land Survey Application

काय कागदपत्रे लागणार

  • आधार कार्ड
  • गटाचा नकाशा
  • टिपण उतारा
  • योजना पत्रक
  • गुंठेवारी मोजणी असेल तर इंजिनिअरचा नकाशा
  • शेती धारकाचे संपूर्ण नाव
  • मोबाईल क्रमांक
  • संपूर्ण पत्ता
  • अर्जदाराच इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला कर्ज करण्यासाठी लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी भूअभिलेखाच्या या संकेतस्थळावर जाऊन अर्जदार आपला अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे त्यांचे काम वेळेत होण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment