दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात फक्त या शेतकऱ्यांना मिळणार Drought subsidy

Drought subsidy राज्यात 2023 मध्ये अतिशय कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरी जावं लागत आहे, कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13500 रुपये तीन हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, व या आनंदाचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याची खालील प्रमाणे माहिती पाहू.

राज्यामध्ये 15 जिल्ह्यात 40 तालुक्याचा दुष्काळामध्ये समावेश केला गेला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली (जिरायत) (कोरडवाहू) (ई-पिक पाहणी) केली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13500 रुपये तीन हेक्टर च्या मर्यादेत. अनुदानाचे पैसे मिळणार आहेत. ह्या अनुदानाचे पैसे राज्य सरकारने मंजूर केले असून, या अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळतील.

दुष्काळग्रस्त 40 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार का?

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार (GR) एका वर्षात एकावेळी निविष्ठा अनुदान वाटप केले जाते, याशिवाव ज्या तालुक्यात अतिवृष्टी किंवा गारपीट नुकसान भरपाई मिळाली आहे, आशा तालुक्यात दुष्काळ जरी जाहीर झाला असला तरी तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही. Drought subsidy

दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आपल्या जवळील तलाठ्याकडे उपलब्ध होतील, शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असला तर तुम्ही तराठ्याकडे संपर्क साधून तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का? याची खात्री करा व तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का? हे अनुदान आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे..?

Leave a Comment