पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० कोटीचा पीकविमा जमा होणार Crop Insurance list 2024

Crop Insurance list 2024 आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव : खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी भरपाईपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळणे अपेक्षित असून सोमवारी कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होणे अभिप्रेत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

या सहा महसूल मंडळामध्ये मोहा ता. कळंब, पाडोळी (आ) ता. धाराशिव सलगरा (दि.) व सावरगाव ता. तुळजापूर तर अनाळा व सोनारी ता. परंडा या महसूल मंडळांचा समावेश आहे. Crop Insurance list 2024

शासन मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी चुकीच्या पद्धतीने ५० % भारांकन लावून नुकसान भरपाई वितरित केली होत. मात्र, शासन व प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर उर्वरित ५० % टक्के रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शविली व एकूण अनुज्ञेय असलेली २८२ कोटीमधील जवळपास २३० कोटी रुपयांची रक्कम वितरितही केली.

शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाईची रक्कम ११० % हून अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी होती. सदरील रक्कम प्राप्त होताच उर्वरित रुपये ५० कोटी वितरण करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. या रकमेचा शासन निर्णय निर्गमित होवून रक्कम कृषी आयुक्तांकडे जमा झाली आहे. सोमवारी सदरील
रक्कम विमा कंपनीच्या खात्यात वर्ग होणे अपेक्षित असून पुढील एक ते दोन दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

उर्वरीत पिकविम्यासाठी सलग दोन
दिवस सुनावनी सन २०२० व २०२१ मधील उर्वरित पीक विम्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. येत्या २० व २१ मार्च रोजी मा. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी आहे.

Leave a Comment