याच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत Crop Damage new

Crop Damage new शिरूर तालुक्यातील बेटभागासह पश्चिम पट्यातील १४ गावात वादळवाऱ्या सह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात त्यांचे नुकसान भरपाई होते ,त्यांचे नुकसान भरपाईपोटी ३ कोटी २२ लक्ष रुपयाची मदत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येत असुन सर्वांने खाते केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहशिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे .

दि २८ डिसेंबर २०२३ रोजी तालुक्यातील बेट भागासह पश्चिम भागात प्रचड वादळ वाऱ्यासह गारपिट झाली होती . गारीपटीची तिव्रता खुप असल्यांने भाजीपाला पिकासह फळझाडे पिकाचेही अतोनात नुकसान झाले . हातातोंडाशी आलेला घास गेल्यांने शेतकरी वर्ग हतबल झाला होता .

या मधे टाकळी हाजी, साबळेवाडी, माळवाडी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, खैरेनगर, सविंदणे ,पाबळ , केंदुर, फाकटे, काठापुर , इचकेवाडी ,कान्हुर मेसाई ,वाघाळे या परीसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळझाडाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते .

त्यामध्ये दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते . याबाबत तहशिलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की पंचनाम्यानुसार नुकसान झालेल्या दोन हजार ७०७ शेतकऱ्यांना तीन कोटी २२ लाख विस हजार रुपयांची मदत मंजुर झाली असुन प्रत्येकांच्या खात्यात वर्ग होत आहे .

Leave a Comment