मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत मिळणार ४ लाखापर्यंत अनुदान

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता मागेल त्याला विहीर योजना योजने अंतर्गत मिळणार आहे ४ लाखांपर्यंत अनुदान. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते.

लाभार्थ्याला या योजने अंतर्गत ४ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा लाभ घेण्यसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढायचे असेल तर पिकांना पाणी देणे आवश्यक असते. पाणी देण्यासाठी जर चांगली विहीरच नसेल तर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अजूनही चांगली विहीर नाही.

ही समस्या लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासन रोजगार निर्मिती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मागेल त्याला विहीर योजना योजना राबविण्यात येत आहे.

अर्ज कसा करायचा आणि कोठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

मागेल त्याला विहीर योजना असा करा ऑनलाईन अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थी मोबाईलवर सुद्धा करू शकतो. संपूर्ण प्रक्रिया बघा खालीलप्रमाणे.

अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला MAHA-EGS Horticulture/Well app या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे हे app plya store वर उपलब्ध आहे.

app सुरु करा व वरील लाभार्थी लॉगीन या पर्यायावर टच करा.

अर्ज सादर केल्यावर तुम्ही या ठिकाणी अर्जाची सध्य स्थिती बघू शकता.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज निर्माण होईल त्यामध्ये विहीर अर्ज पर्यायावर टच करा.

याठिकाणी लाभार्थ्याला स्वतःची माहिती भरावी लागणार आहे जसे की लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत, आणि गाव कोणते आहे.

वरील ही सर्व माहिती भरल्या नंतर लाभार्थ्याला जॉब कार्ड क्रमांक खालील चौकटीमध्ये टाकायचा आहे. त्याखाली जॉब कार्ड चा फोटो टाकायचा आहे.

लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे ते निवडा.

लाभार्थ्याकडे जमीन किती आहे ती टाका (८अ प्रमाणे)

खलील चौकटीमध्ये विहीर भूमापन क्रमांक टाका. हा क्रमांक सातबाऱ्यावर असतो.

ही सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि खालील पुढे जा या बटनावर क्लिक करा.

या बटनाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रपत्र अ (संमतीपत्र) दिसेल.

पेज च्या शेवटी या परत पुढे जा यावर क्लिक करा.

याठिकाणी प्रपत्र ब असेल.

पेज च्या खाली या, या ठिकाणी तुम्हाला अर्जी जमा करा असे एक बटन देसेल त्याला दाबा.

अर्ज करताना लाभार्थाने जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावर एक otp पाठवला जाईल तो या चौकटीत टाका.

धन्यवाद अर्ज यशस्वी प्रस्तुत केला असा message दिसेल

Leave a Comment