अवकाळीच्या नुकसानीसाठी शासनाकडून निधी आला हे काम करा तरच मिळणार पैसे nuksan bharpai

nuksan bharpai अवकाळीच्या नुकसानीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.

नोव्हेंबर २०२३ मध्ये सलग सात दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी पहिल्या टप्प्यातील 1 कोटी ९३ लाख २ हजार वर्ग करण्यात आले आहे.

पंरतु यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची ई केवायसी अनिवार्य आहे त्यामुळे ई केवायसी नासलेल्या शेतकऱ्यांना तूर्तास याचा लाभ मिळणार नाही. nuksan bharpai

सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे ७७३ हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले या नुकसानीपोटी 1 हजार ७०० शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईपोटी 3 कोटी २९ लाख रुपये इतक्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

त्यापैकी पहिल्या टप्प्यात २४ गावातील ९९९ 1 कोटी ९३ लाख इतकी रक्कम शासनाच्या ई पंचनाम पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

त्यामुळे नुकसान भरपाईसाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे दरम्यान उर्वरित ७०१ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या याद्या अपलोड करण्यासाठी प्रशासनाने काम हाती घेतले आहे.

अवकाळीच्या नुकसानभरपाईचा शासन निर्णयाप्रमाणे वाधीव निधी देण्यात आला आहे जीरायतीसाठी हेक्टरी १३ हजार ५००, बागायतीसाठी १७ हजार व फळबागासाठी २२ हजार रुपये नुकसानीपोटी रक्कम मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी लवकर ई केवायसी करावी

शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बँक खात्याची ई केवायसी करून घ्यावी ई केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment