सन २०२२ च्या पीक विम्या संदर्भात महत्वाची अपडेट पहा संपूर्ण माहिती 2022 pik vima

 2022 pik vima जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ चा उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत..दरम्यान , काही राजकीय नेते विमा कंपनीची बाजू घेऊन दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

ख्ररीप २०२२ हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले होते, काही ठिकाणी अनेक दिवस पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांना पीक विमा देणे बंधनकारक असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने निम्मीच रक्कम वाटप करून शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या होत्या. याप्रकरणी अनिल जगताप यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत. आठवड्याला केवळ ५० कोटी रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले असून, त्यामुळे सर्व पात्रधारक शेतकऱ्यांना विमा मिळण्यास किमान दीड महिना लागणार आहे. 2022 pik vima

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ चा उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत..दरम्यान , काही राजकीय नेते विमा कंपनीची बाजू घेऊन दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. या राजकीय नेत्यांना विमा कंपनीकडून कमिशन मिळाले की काय ? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment