Mahatama Phule Karj Yojana प्रोत्साहन अनुदानाच्या बैठकीसाठी तारीख पे तारीख शेतकरी प्रतीक्षेत

Mahatama Phule Karj Yojana राज्य शासने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती यामध्ये अनेक शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले.

परंतु अजूनही बरेच असे शेतकरी आहे त्यांना अजूनही ५० हजार अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या त्यांना का लाभ मिळत नाही या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

जे शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी पात्र होते त्यांना दोन टप्प्यात पैसे मिळाले पंरतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही.

या संदर्भात अनेक दिवसापासून शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. यावर मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत होणारी बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढण्यात आली आहे. Mahatama Phule Karj Yojana

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने राज्य सरकार त्यामध्ये गुंतल्याने ही बैठक होऊ शकली नाही. कर्ज परतफेडीचा कालावधी आणि आर्थिक वर्ष या मुद्यामुळे पेच निर्माण झाला आहे. यामुळे ही बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी २६ जानेवारी पूर्वी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी (दि. २२) ही बैठक होती, पण आता ही बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे आश्वासन वळसे-पाटील यांनी दिल्याची माहिती धनाजी चूडमंगे यांनी सांगितले.

Leave a Comment